Maharashtra Politics: Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदे गटातील नेते भाजपात जाणार; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut On Shiv Sena: शिवसेना हा एकनाथ शिंदे यांचा पक्ष नसून अमित शहा यांनी त्यांना तो पक्ष दिलाय. परंतु पुढील काळात तो एकसंघ राहील याबाबत शंका असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

Bharat Jadhav

महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? पुन्हा एकदा शिवसेनेत फूट पडणार? हे प्रश्न उपस्थित करत आहोत ते संजय राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवरून बोलतांना संजय राऊत यांनी राजकीय भूकंपाचा दावा केलाय. एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा पक्ष नाही, तर अमित शहा यांनी त्यांना तो पक्ष दिलाय. त्यामुळे तो त्यांचा पक्ष नाहीये. त्यांचा पक्ष एकसंघ राहील की नाही याबाबत शंका असून पुढील काळात त्यातील अनेकजण भाजपमध्ये जातील, असा दावा राऊतांनी केलाय.

त्यांच्या विधानाने पुन्हा एकदा शिवसेना फुटीची चर्चेने जोर धरलाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. मात्र मुख्यमंत्रिपद आणि त्यानंतर खातेवाटप आणि आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद दिसून येत आहे. राज्य कारभाराचा निर्णय घेताना भाजप एकनाथ शिंदेंना दूर ठेवत आहे. पालकमंत्रिपद आणि मंत्रिपदावेळी एकनाथ शिंदेंनी नाराज व्यक्त केली होती. नेहमी, नेहमी डावललं जात असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

भाजप शिंदेंना दूर करत उदय सामंत यांना पुढे करत आहे, त्यांना उपमुख्यमंत्री केलं जाणार असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात होती. काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी सुद्धा त्याबाबत विधान केलं होतं. त्यांच्या विधानामुळे शिंदे गटात फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण वडेवट्टीवार यांचा दावा सामंत यांनी फेटाळून लावलं होतं.

संजय राऊतांच्या विधानामुळे शिंदे गटातील फुटीवरच्या चर्चेला आता परत एकदा पेव फुटले आहे. काही दिवसांपासून महायुतीत काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत. अनेकदा त्यांची नाराजी दिसून आलीय. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचे फोन दिल्लीतून टॅप केले जात असल्याची बातमी समोर आली.

आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर असल्याचं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT