Uddhav-Raj Thackeray Alliance saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिक्कामोर्तब! ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार

Uddhav-Raj Thackeray Alliance: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार असल्याबाबतचे संकेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

Priya More

Summary -

  • ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार.

  • संजय राऊत यांनी युतीची पुष्टी दिली.

  • मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण पालिकेवर ठाकरे बंधुंची सत्ता येणार- संजय राऊत

आगामी महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण या चर्चांवर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही. राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची पक्षाच्या सर्व नेत्यांपासून कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठीवरून ते एकत्र येणार असेच म्हटले जात आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत मोठं विधान केले आहे. महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, 'मुंबईसह, ठाणे, नाशिक, कल्याण अशा सर्व ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका जिंकतील. या सर्व महानगरपालिकांवर आमची चर्चा सुरू आहे आता कोणतीही अघोरीशक्ती आली तरी, मराठी माणसाची वज्रमुठ तोडू शकत नाही.' संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसे एकत्र निवडणुका लढणार हे आता निश्चित झाले आहे.

संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सांगितले की, 'राज ठाकरे चुकीचे काय बोलले. मुंबईत काय नाशिक, ठाणे, कल्याण डोंबवलीमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहोत. याशिवाय आणखी महापालिका आहेत तिथं आमची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मराठी माणसाची ताकद आहे. आता कोणतीही अघोरी ताकद चालणार नाही.'

मटण-चिकन बंदीवरू संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, 'आम्ही असा स्वातंत्र्य दिन पाहिला नाही. यांनी देश धर्मांध केला आहे. काँग्रेसने कुठे काय आणलं. कत्तलखाना शासकीय म्हणून बंद आहे. शासनाची सुट्टी आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, वाहतूककोंडी फोडण्यासाठी १४२६० कोटींचा मेगाप्लान, वाचा

Shubman Gill: चौकार लगावल्यानंतर शुभमन गिलच्या मानेत का झाल्या तीव्र वेदना? ही परिस्थिती कितीपत असते गंभीर?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: नामांकनासाठी आज शेवटचा दिवस, रॅलीसह शक्ती प्रदर्शनाची तयारी

Weekly Horoscope: 'या' राशींना शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT