Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: पंतप्रधानांची गॅरंटी खोटी निघाली, भाजप- मोदींच्या विश्वासाला तडा बसला', शरद पवारांचे टीकास्त्र; पाहा VIDEO

Sharad Pawar Baramati Visit: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे गेल्या तीन दिवसांपासून ते बारामतीमधील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. आज बारामतीमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले.

Gangappa Pujari

बारामती, ता. २० जून २०२४

लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बारामतीमधील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. आज त्यांच्या या दौऱ्याचा तिसरा दिवस असून या सर्व दुष्काळी भागाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

"या दुष्काळी दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद झाला. दुष्काळी भागाला न्याय देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्यात बऱ्याच गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. या दौऱ्यामुळे लोकांचे सुख दुःख जाणून घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा आम्ही दौरा करणार असून राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्ष ज्या जागा आहेत तिथे जाऊन देखील आम्ही लोकांशी भेटणार आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी आरएसएसने घेतलेल्या बैठकीवरुनही महत्वाचे विधान केले. "महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा भाजप, मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांना विश्वासाला तडा बसला आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाल्या, मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास नाही," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राज्यात सुरू असलेल्या ओबीसी- मराठा बांधवाच्या संघर्षावरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले. "केंद्र सरकारने यात पुढाकार घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करायला लागेल, केंद्राला बघ्याची भूमिका घेतली जाणार नाही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची जबाबदारी सगळ्यांची आहे," असे म्हणत या प्रश्नी केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

Dahi : आंबट दही फेकून देऊ नका,  ५०% लोकांना फायदे माहीतच नाहीत, ५ वा उपाय थेट पैसे वाचवेल

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT