Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजितदादाचं ठरलं! बारामतीत शरद पवार यांची नवी खेळी?

Priya More

बारामतीमध्ये शरद पवार कुणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू आहे. उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये बारामती मतदारसंघासाठी एकाचीही मुलाखत झाली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरू आहेत. काही पक्षांनी उमेदवारांच्या नावाची देखील घोषणा केली.

संपूर्ण राज्याचे लक्ष आहे ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे. बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा सुरू होती. बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पण आता बारामतीसाठी शरद पवारांनी नवा डाव टाकल्याची चर्चा होत आहे.

शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मात्र बारामतीसाठी अद्याप एकही इच्छुकाने मुलाखत दिलेली नाही. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता चर्चा देखील बारामतीमध्ये रंगली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून १ हजार ६८० इच्छुकांनी अर्ज केले. त्यामधील १ हजार २८० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. बारामतीसाठी कोणीही मुलाखत दिलेली नाही. मुंबई आणि कोकणातील ४०० इच्छुकांच्या मुलाखती आजपासून मुंबईत होणार आहेत. बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे 'तुतारी' हाती घेऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीस ते उपस्थितच राहिले नाहीत. त्यामुळे आता बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय झाले होते. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी देखील बारामती पिंजून काढली होती. 'वादा तोच दादा नवा', अशा आशयाचे बॅनर बारामतीमध्ये झळकले होते. युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बारामतीचे उमेदवार असतील, अशी चर्चा लोकसभेपासून रंगली होती कारण ते पक्षासाठी काम करू लागले होते. पण बुधवारी युगेंद्र पवार यांच्यासह कोणीही मुलाखतीसाठी आले नाहीत. त्यामुळे आधी प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल याचा अंदाज घेऊन त्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये आपला उमेदवार जाहीर करण्याची खेळी करतील अशी चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, पिंपरी चिंचवडमधील घटना

Pune Porsche Case: आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला, बाल न्याय मंडळाचे २ अधिकारी बडतर्फ

Ratan Tata News: मैत्रीला सलाम! जिवलग दोस्त पुढे अन् रतन टाटांचे पार्थिव मागे; काळजाला भिडणारा VIDEO

Ratat Tata Passed Away : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वाहिली रतन टाटांना श्रद्धांजली

Relationship Tips : लग्नानंतर पत्नीबद्दल 'या' गोष्टी कधीच कुणाला सांगू नका; संसारात येईल मोठं वादळ

SCROLL FOR NEXT