Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दिवाळीत मोठा धमाका होणार, शिंदे गटातील बड्या नेत्याच्या दाव्याने शरद पवार गटाची चिंता वाढली

Shambhuraj Desai: शरद पवार गटाचा मोठा नेता शिंदे फडणवीस सरकारसोबत येणार असल्याचे संकेत व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट केलाय.

Ruchika Jadhav

ओंकार कदम

Shambhuraj Desai On Cabinet Expansion:

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका होणार असल्याचे संकेत मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केलेत. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचा मोठा नेता शिंदे फडणवीस सरकारसोबत येणार असल्याचे संकेत व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. (Latest Marathi News)

मंत्रिमंडळ विस्तार कधी

पित्रपक्ष संपल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्यात. मंत्रिमंडळ विस्ताराआधी राज्यात मोठा राजकीय धमाका होणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. याच बाबत उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांना विचारले असता त्यांनी लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं सांगीतलं. तसेच शरद पवार गटाला आणखीन मोठी खिंडार पडणार असल्याचं भाकीत व्यक्त केलं.

का होतोय विलंब?

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेत्यांच्या सरकारसोबत येण्याच्या चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होत आहेत. यामुळेच कदाचित मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा असा गौफ्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केलाय.

यंदा दिवाळीत मोठा धमाका

लवकरच तो विस्तार होईल असं सांगत दसरा दिवाळीत नेहमी धमाके होतच असतात मात्र यावेळी मोठा धमाका होईल, असा गौफ्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केला आहे. यामुळं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कोणता बडा नेता शिंदे फडणवीस सरकारसोबत जाणार हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT