Shambhuraj Desai News: 'अपात्रतेच्या सुनावणीत गडबड नको, दोषी असेल तर कारवाई करा..' मंत्री शंभूराज देसाईंचे विधान

Shivsena MLA Disqualification Case: शिवसेना शिंदे- गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला अखेर सुरूवात झाली आहे.
shambhuraj desai, satara.
shambhuraj desai, satara. saam tv
Published On

Satara News:

शिवसेना शिंदे- गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला अखेर सुरूवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याची टीका केली होती. यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

shambhuraj desai, satara.
Akola Donkey's Pola: अकोटमध्ये आगळीवेगळी परंपरा! पोळ्याच्या दिवशी बैलांचा नव्हे तर गाढवांचा पोळा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमदार अपात्रतेच्या कारवाईत वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी हा आरोप केला होता. भास्कर जाधव यांच्या या आरोपावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले शंभूराज देसाई...

"आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत गडबड करू नये. आमदारांना आपली बाजू मांडण्यास पुरेशी संधी द्यावी. दोषी असले तर कारवाई करावी; पण आमचे आमदार दोषी नाहीत. त्यामुळे या प्रकरणात वेळकाढूपणा करण्याचा संबंधच नाही.. असे शंभूराज देसाई यावेळी म्हणाले. तसेच आम्हाला एक हजार एक टक्के माहित आहे. आम्ही दोषी नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एवढ्या लोकांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या अर्थी टिकणारे मराठा आरक्षण' हे शिंदे साहेबच देऊ शकतील असा विश्वास जारांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रियाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. (Latest Marathi News)

shambhuraj desai, satara.
Bail Pola: बैलावर कोरली मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा; गावातल्या बैलपोळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com