Maharashtra Politics google
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजीनाम्यानंतरही पाय खोलातच; खंडणीची मागणी मुंडेंच्या कार्यालयात, पाहा स्पेशल रिपोर्ट

Dhananjay Munde: सरपंच देशमुख हत्याकांडात आकाचा आका अडचणीत येऊ शकतो. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या जबाबामुळे त्याच्या भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्याच्या जबाबात काय म्हटलं आहे, हे समोर आलं.

Bharat Mohalkar

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आता आकाचा आका अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याचा जबाब. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या जबाबात नेमकं काय म्हटलं आहे? आणि खंडणी प्रकरणात मुंडेंचं टेन्शन का वाढलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये काय आहे.

सरपंच देशमुखांच्या हत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या खंडणी प्रकरणाचे धागेदोरे आता मुंडेंपर्यंत पोचत असल्याचं चित्र आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे एकदा दोनदा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेंच्या तपासातून समोर आलं आहे.

आरोपपत्रात खंडणीसाठीची बैठक धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात झाल्याचा उल्लेखही या आरोपपत्रात आहे. दुसरीकडे आरोपपत्रात कराडने धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात आणि सातपुडा बंगल्यावरुन खंडणी मागितल्याचं समोर आल्यानं खंडणीप्रकरणात मुंडेंचा स्पष्ट सहभाग असल्याचा आरोप दमानियांनी केला आहे.

आतापर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा स्पष्ट सहभाग समोर येत नव्हता. मात्र आता धनंजय मुंडेंचा शासकीय बंगला आणि जगमित्र कार्यालयातून खंडणी मागितल्याने आता मुंडेंची चोकशी होणार का? त्याचबरोबर धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं जाणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

Mega Block : ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार, रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक; पाहा वेळापत्रक

Ajit Pawar Slams Laxman Hake: विनाशकाले विपरीत बुद्धि! मी त्याला किंमत देत नाही; अजित पवार संतापले|VIDEO

Health Tips: दात घासल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

Manoj Jarange Patil : सरकारने भंगार खेळ खेळणं बंद करावं, आरक्षण देऊन टाकावं; आझाद मैदानातून मनोज जरांगे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT