Sanjay Raut vs Narayan Rane Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊतांनी पुन्हा एकदा राणेंना डिवचलं; स्पष्टीकरण देत म्हणाले, राज्यपाल झाले तर मजा येईल...

सध्या राज्यात अनेक घटनाबाह्य गोष्टी घडत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

Shivaji Kale

Sanjay Raut : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच आपल्या पदावरून पदमुक्त होत आहेत. त्यामुळे नवे राज्यपाल कोण असतील या बाबत काही नावांची चर्चा सुरू आहे. अशात आता संजय राऊत यांनी राज्यपाल पदावरून नारायण राणे यांच्यावर भाष्य केलं आहे. ते राज्यपाल झाले तर मजा येईल..., अशा पद्धतीचं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. (Latest sanjay raut News)

राणे आणि ठाकरे या दोघांमधील वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर भंभीर आरोप केले होते. राऊतांना मीच खासदार केलं आहे, असं क्रेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी राणेंनी जे म्हटलं आहे ते कोर्टात सिद्ध कराव असं आव्हान केलं. या वादावर आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाना साधला आहे.

नियम आणि कायद्याचा विचार केला तर कोणताही व्यक्ती ज्या राज्याचा नागरिक असेल तिथेच राज्यपाल होऊ शकत नाही. मात्र सध्या राज्यात अनेक घटनाबाह्य गोष्टी घडत आहेत. त्यांनी देखील घटनाबाह्य कृत्य केलं असल्यास नारायण राणे राज्यपाल झाले तर मजा येईल, असं संजय राऊत म्हणाले.

सध्या सरकारचे सत्कार समारंभ आणि लग्न सोहळे सुरू आहेत. आदित्य ठाकरे या आमच्या ३२ वर्षांच्या तरूणाने आव्हान दिल्यानंतर फक्त मुख्यमंत्री येत नाही तर उपमुख्यमंत्री देखील येत आहेत. त्यांनी राजीनामा देऊन यायला हवं. ३२ वर्षांच्या तरूणाला हे सरकार घाबरले आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदार संघात निवडणूका होणार दोनही मतदारसंघातलं चित्र भाजपसाठी अनुकूल नाही,असंही राऊत म्हणाले.

विदर्भातून एक मोठा प्रकल्प बाहेर गेला आहे. कुवेत येथील एक कंपनी विदर्भाऐवजी आता मध्यप्रदेशात गुंतवणूक करत आहे. २६ हजार कोटींची गुंतवणूक ही कंपनी करणार आहे. प्रकल्प बाहेर जात असल्याने याविषयी संजय राऊत म्हणाले की, " विदर्भातून अनेक प्रकल्प बाहेर गेले आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेल्याबाबत आज मुख्यमंत्री वरळी सभेत काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. हा चौथा मोठा प्रकल्प आहे जो महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे."

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी ती जागा मागितली. आम्ही महाविकास आघाडी उमेदवार निवडून आणू. नाना काटे यांना आम्ही ओळखतो. टिळक कुटुंबाशी आमची सहानुभूती आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी दिला जात आहे, असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Fast: उपवासात लिंबू पाणी चालतं का? जाणून घ्या सत्य

Nagpur: बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'ची फाईल, नागपुरमधील 'त्या' VIDEO मुळे उडाली खळबळ

Nag Panchami Fast: नाग पंचमीला स्त्रिया भावासाठी उपवास का करतात?

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

SCROLL FOR NEXT