Devendra Fadnavis | Sanjay Raut  SaamTvNews
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'आता राजीनामा नको, गृहमंत्र्यांना हाकला...' संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर संतापले; CM शिंदेंवर गंभीर आरोप

Baba Siddique Death: आतापर्यंत आम्ही गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो आता गृहमंत्र्यांना यांला हाकला, त्यांची हकलपट्टी करा... असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई

Sanjay Raut: काल रात्री या राज्याचे माजी मंत्री, आमदार आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहिलेले बाबा सिद्दिकी यांचे हत्या झाली. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यांच्यासोबत अनेक माणसं होती. त्यांना मारेकरांनी गोळ्या घातल्या, राज्यात, मुंबईत ज्या पद्धतीने हत्यांचे सत्र सुरू आहे. त्या आता राजकीय नेते, आमदार, मंत्री यांच्यापर्यंत पोहोचल्यात. याबाबत या राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे,असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवरुन संताप व्यक्त केला. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"राज्यामध्ये राजकीय कार्यकर्ते व राजकीय नेते सुरक्षित नाही, गृहमंत्री काय करतात. या राज्याचे गृहमंत्री हरियाणामध्ये जिंकले येथे पेढे वाटत होते, पेढे खात होते पण राज्यात खंडणी सत्र सुरू आहे अशावेळी राजाचे गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? तुरुंगामध्ये दंगली, मारामाऱ्या सुरु आहेेत या महाराष्ट्राच्या इतिहासात अपयशी, निष्क्रिय असे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो आता गृहमंत्र्यांना हाकला, त्यांची हकलपट्टी करा..." असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

"देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आता काय झाले. माझ त्यांना आवाहन आहे, विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा राजाच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे, त्या पदाला कर्तव्य भावनेने जागून काम करा. कालची घटना भयंकर आहे. बाबा सिद्दीकी तुमच्याच आघाडीत सामील असताना त्यांनी सुरक्षा व्यवस्था मागितली याच्या मागचे कारण भविष्यात येतील. मात्र हत्या झाली, याच्यावर गृहमंत्र्यांनी खुलासे करत बसू नये, त्यांना खंत वाटत असेल तर गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा किंवा राज्यपाल यांनी राजीनामा घ्यावा," अशी मागणी राऊत यांनी केली.

मुंबई संवेदनशील भाग आहे. तिथे आयपीएस दर्जाचे पोलीस नियुक्त करणे आवश्यक आहे. मात्र ठाण्यात एकनाथ शिंदेंची हुजरेगिरी करणाऱ्या, बॅगा उचलणाऱ्या पोलिसांची नियुक्ती केली जाते. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो. खंडण्या गोळा करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो. त्याच्यामुळे या हत्या होणारच. तुम्ही सिंघम आहात ना, हे तीन तीन सिंगम महाराष्ट्राला लाभले आहेत दिवसा ढवळा हत्या होतात. तुम्ही कुठे असता? असा सवालही राऊतांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात 11 ठिकाणी तब्बल १४२ पथके गठित

प्रवाशांसाठी खूशखबर! तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याचं टेन्शनच संपलं, मध्य रेल्वेने केली खास सोय

कोणतरी गेलं बाबा मला मारलं..., उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली|VIDEO

Asambhav: नव्या नात्यातील दरवळ बहरणार; मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रेक्षकांच्या समोर

Whatsapp Number Leak: सावधान! आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर चोरी

SCROLL FOR NEXT