SANJAY RAUT’S DIG AT FADNAVIS’ WIFE AMID DELHI VISIT SPECULATION 
महाराष्ट्र

'वहिनीसाहेब मोठा बंगला मिळेल'; राऊतांचा अमृता फडणवीसांना खोचक सल्ला

Sanjay Raut Statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी फडणवीसांच्या पत्नीला खोचक सल्ला दिलाय.

Rohit Kadam

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. संजय राऊत याबाबत रोज नवेनवे दावे करत असतात. हे दावे खोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीदेखील मैदानात उतरल्यात. मात्र, संजय राऊतांनी मिसेस मुख्यमंत्र्यांना काय सल्ला दिलाय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची चर्चा काही केल्या थांबवण्याचं नाव घेत नाहीये. फडणवीसांना दिल्लीत जावं लागणार असल्याचं सांगत ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत रोज नवनवे दावे करतायत. त्यांचे दावे स्वत: फडणवीसांनीही फेटाळून लावले आहेत. यात फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचीच सेवा करू देण्याची आग्रही भूमिका मांडली.

मात्र यावरून आता राऊतांनी आरएसएस आणि भाजपसाठी राष्ट्र प्रथम असल्याचं सांगत अमृता फडणवीसांना खोचक टोला लगावलाय. एव्हंढच नाहीतर फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीगाठींमुळे राज्यात अनेक तर्कवितर्क लढवले जाताहेत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन महिन्यांत कितीवेळा दिल्ली दौरा केलाय ते पाहूयात.

28 मे 2026

मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची नवी दिल्लीत खलबतं

07 जुलै 2026

दिल्लीतील कर्तव्य भवनात मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बैठक

25 जुलै 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना

17 ऑगस्ट 2026

मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींची भेट

तब्बल 5 वर्षे केंद्रीय शिक्षणमंत्रीपद सांभाळणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय नेतृत्व नव्या पर्यायाच्या शोधात आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रधानांनी राजीमाना दिल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर फडणवीसांच्या वाढत्या दिल्लीतल्या गाठीभेटी राज्याच्या राजकारणात नवे संकेत देताहेत. त्यातच राऊतांनी दररोज नवनवे दावे करून फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत संबंध महाराष्ट्राची उत्सुकता वाढवलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

MPSC Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली; आता कधी होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT