Sanjay Raut News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'लाडक्या बहिणींना १५०० रुपयांसह धमक्यांचा बोनस', संजय राऊतांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १८ ऑगस्ट २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेसाठी महायुती तसेच महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच राज्यात आघाडीला बहुमत मिळणार नसल्याचा सर्वे समोर आला आहे. मात्र हे सर्वे फेक असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती पराभूत होणार असल्याचा दावा केला आहे. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"वन नेशन वन इलेक्शन हा मोदींचा नारा आहे. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, काश्मिरच्या निवडणूका एकत्रच व्हायला हव्या होत्या. त्यांनी घेतल्या नाहीत. कारण त्यांना झारखंडमध्ये निवडणूकीपूर्वी गडबड करायची आहे. सोरेन यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये सरकारची तिजोरी मतांसाठी रिकामी करायची आहे. म्हणून दोन राज्यांच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत," असं संजय राऊत म्हणाले.

सर्वेवरुन टीकास्त्र!

तसेच "राज्यामध्ये महाविकास आघाडीला १८० जागा मिळतील. आत्ता समोर आलेले सर्वे दिशाभूल करण्यासाठी आहेत. लोकसभेला मोदींना ३५० जागा मिळणार असा सर्व्हे आला होता. आता हे सर्व्हे ब्रम्हदेवाचा सर्व्हे आहे का? महाराष्ट्रात महायुतीला ४० जागा दाखवल्या होत्या. प्रत्यक्षात किती मिळाल्या? असा सवाल करत हे सर्व्हे संभ्रम निर्माण करण्यासाठी आहेत," असं राऊत म्हणाले.

महायुतीला टोला!

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरुनही महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. जर लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमाला आला नाही तर महिलांना धमक्या दिल्या आहेत, हे सत्यच आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये आणि धमक्या मिळत आहेत. म्हणजे १५०० रुपयांसोबत धमक्यांचा बोनस दिला जात आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Rules: चुकीला माफी नाही..IPL मध्ये ही चूक केल्यास थेट 2 वर्षांचा बॅन

Crime News : कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; मुंबईमधील खळबळजनक घटना

Stress Free होण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा...

Sharad Pawar News: रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Viral News: असलं धाडस नको! पुराच्या पाण्यात दुचाकी टाकणं अंगलट; तरुण वाहून जातानाचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT