Sanjay Raut Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'दरोड्याची पोलखोल करणार...' महा पत्रकार परिषदेआधी राऊतांचा हल्लाबोल; CM शिंदे, नार्वेकरांना थेट आव्हान

Sanjay Raut Press Conference: अशा प्रकारची खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत राहुल नार्वेकरांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवावी," असे आव्हानही संजय राऊतांनी यावेळी केले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. १६ जानेवारी २०२४

Sanjay Raut News:

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. या निर्णयावर आज ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असून नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल केली जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनीही आजची पत्रकार परिषद नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल करेल असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.

काय म्हणालेत संजय राऊत?

"बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिवसेना. त्यांच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार, खासदार. अशा प्रकारे पैशाच्या जोरावर पळवून न्यायचे, आणि चोरबाजी करायची. हे तुम्हालाच लखलाभ होवो, आम्ही लढत राहू," अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

तसेच "आज याच विषयावर, दरोडे कसे टाकण्यात आले, यावर महापत्रकार परिषद आयोजित केली आहे. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे. अशा प्रकारची खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत राहुल नार्वेकरांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवावी," असे आव्हानही संजय राऊतांनी यावेळी केले.

दाओस दौऱ्यावरुन टीका...

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दाओस दौऱ्यावरुनही जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे सरकारी पैशातून केलेली सहल आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच दाओसला जाण्याआधी गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणा, मग दाओसला जा, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

Milk Malai Benefits For Skin: दुधाची साय चेहऱ्याला लावा, कोरडी त्वचा होईल मऊ अन् मुलायम

'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

Unhealthy Sleeping Pattern: 8 तासांची झोप घेऊनही तुमच्याकडून नकळत होतेय 1 चूक; आजारी पडण्याची शक्यता वाढते

SCROLL FOR NEXT