Sanjay Raut News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'खिचडी घोटाळ्यातील सर्व लाभार्थी भाजप अन् शिंदे गटात...' संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics: "पलटवार करण्याची संधी आम्हालाही मिळणार आहे. आम्ही वार केल्यानंतर तुम्ही उठणारही नाही..." असा थेट इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला

Gangappa Pujari

Sanjay Raut News:

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल रविंद्र वायकर यांचीही ईडी चौकशी करण्यात आली. आज खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे बंधु संदीप राऊत यांची ईडी चौकशी होणार आहे. या सर्व ईडी चौकशींवरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप, शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

"महाराष्ट्रातून उद्योग पळून जात आहेत. ८००० कोटींचा अम्बुलन्स घोटाळा आहे. राहुल कूल यांचा ५०० कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे, त्यावर सरकारने बोलावं. अजित पवार यांच्या ७०,००० कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर बोलावं, सरकारमध्ये ती हिंमत आहे का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

तसेच "हा खिचडी घोटाळा जर झाला असेल तर त्यातले सगळे लाभार्थी हे ज्यांनी पालिकेकडून पैसे घेऊन खिचडी वाटप केले नाही, ते सगळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात आहेत. त्यामधल्या काहींचं वर्षा बंगल्यावर, देवगिरी बंगल्यावर केटरिंग चालू आहे, सूरज चव्हाणला अटक केली मात्र त्यांना हात लावत नाही," असा आरोप संजय राऊत यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"या घोटाळ्यात अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कर्नाल या लोकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार महापालिकेत केला आहे. यांची नावे घेण्याची ईडीची हिंमत आहे का? असा सवाल करत पलटवार करण्याची संधी आम्हालाही मिळणार आहे. आम्ही वार केल्यानंतर तुम्ही उठणारही नाही.. असा थेट इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT