Sanjay Raut  Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'पाणबुडी'प्रकल्पावरुन राजकारण तापलं! राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; अजित पवारांना थेट आव्हान

Submarine Project : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतल्याचे समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ३१ डिसेंबर २०२३

Sanjay Raut News:

सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली होती.

देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्स जवळील समुद्रात येणार होता. मात्र आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतल्याचे समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाचार...

"आत्तापर्यंत महाराष्ट्रामधून १७ प्रकल्प बाहेर गेले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत, परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत. मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत. मुंबईची वाट लावण्याचे धोरण हे सरकार करत आहे..." अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

मोदींवर निशाणा...

"नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा, कुठल्या ही पंतप्रधानाने असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. गुजरातला सोन्याने मढवा पण त्यासाठी महाराष्ट्राची लुट करु नका," असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ शिंदे, अजित पवारांना आव्हान

नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलण्याची हिंमत नाही. नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये होते ना तर त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार (Ajit Pawar) तुम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव सांगता मगं राज्यातून एक ही प्रकल्प गुजरातला जाऊ देणार नसल्याची हिंमत दाखवा.. असे थेट आव्हान राऊतांनी दिले.

राममंदिरावरुन टीकास्त्र...

"राम मंदिर सोहळा हा आनंदाचा क्षण आहे. देशाचा सोहळा पाहिजे हा तर आता भाजप सोहळा झाला आहे. भाजप ने राम मंदिराचा सोहळा राजकीय केला. अक्षदा वाटत आहेत की जणू एक लग्न सोहळा आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेने बलिदान दिले त्याला आम्हाला कुठले ही गालबोट लावायचे नाही पण आम्ही योग्य वेळी बोलू..." असेही राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

SCROLL FOR NEXT