Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसचा बडा नेता भाजपात जाणार? संग्राम थोपटेंच्या बंडाने बारामतीला हादरा

Sangram Jagtap: राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे.

Priya More

स्नेहिल झणके, साम टीव्ही

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे. तर त्याचा हादरा काँग्रेससोबतच शरद पवारांनाही बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचा दिग्गज नेता भाजपच्या गळाला लागलाय. मात्र हा नेता कोण आहे? हे आपण स्पेशल रिपोर्टमधून पाहणार आहोत.

राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागलीये. थोपटेच्या या निर्णयानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच काँग्रेसलाही धक्का बसलाय.

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. तीन वेळा ते भोरमधून काँग्रेसचे आमदार राहिले. वडील अनंतराव थोपटे ६ वेळा भोरमधून काँग्रेस आमदार राहिले होते. ते राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देखील आहेत. विधानसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचा पराभव झाला होता.

भोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद होता. मात्र यावेळी लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळेंना घरातून सुनेत्रा पवारांचे आव्हान आल्यानं शरद पवारांनी 40 वर्षांपासून असलेल्या राजकीय वैराला मुठमाती दिली. थोपटेंच्या घरी जाऊन त्यांनी नवी राजकीय समीकरणं जुळवून आणली.परिणामी सुप्रिया सुळेंना भोरमधून मोठं मताधिक्य मिळालं. त्यामुळे थोपटेंचं भोरमधील वर्चस्व कायम होतं. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन एकाच वेळी शरद पवार आणि काँग्रेसला धोबीपछाड देण्यास भाजप यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

संग्राम थोपटेंनी मात्र अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही..त्यंाच्या अडचणीत आलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं. मात्र लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंचं काम केल्याने अजित पवारांनी हे मार्जिन मनी लोन रद्द केलं. त्यातच विधानसभेतील पराभव झाल्यामुळे थोपटे भाजपवासी होण्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT