Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांकडून भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Sangli NCP Ajit Pawar Group: सांगलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीदरम्यान भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Priya More

Summary:

  • महापालिका निवडणुकीपूर्वी सांगलीत मोठी राजकीय घडामोड घडली

  • सांगली आणि कुपवाडमध्ये अजित पवार गटात इनकमिंग सुरूच

  • अजित पवारांनी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपला मोठा धक्का दिला

  • सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली

विजय पाटील, सांगली

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये इन्कमिंग अजून सुरूच आहे. अजित पवार गटाकडून एकापोठापाठ भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांना धक्का दिला जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुपवाड शहराध्यक्षासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे सांगलीमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते या सर्वांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शिवसेना ठाकरे गटाचे कुपवाड शहराध्यक्ष रुपेश मोकाशी आणि भाजपाचे पदाधिकारी प्रशांत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये इनकमिंग सुरू आहे. मिरज, सांगलीनंतर आता कुपवाडमध्ये देखील अजित पवार गटात झालेल्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढली आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये देखील अजित पवारांची पावर पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांची पुण्यात देखील ताकद वाढली आहे. पुण्यामध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि मनसेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. १० दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. पालिका निवडणुकीदरम्यान पुण्यात झालेल्या या राजकीय भूकंपामुळे भाजप आणि शिवसेनेसह इतर पक्षाला मोठा हादरला बसल्याचे म्हटले जात आहे. तर आजही आणखी काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT