जगातली सगळी ताकद तुमच्यासोबत आली तरी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारच, असा इशारा समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे. त्यामुळे कागलमध्ये महायुतीत बंडाला सुरुवात झाल्याची चीन्ह पहायला मिळताना दिसत आहेत. समरजितसिंह घाटगे देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय मानले जातात, मात्र मुश्रीफ विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मला माझं एकट्याचं तरी मतदान पडणार की नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
मतदारसंघातील मतदारांनी आता आपल्या भविष्यासाठी आणि विकासासाठी मला मतदान करायचं आहे. आता ही निवडणूक तुम्ही सर्वांनी आपल्या हातात घ्यायची आहे. समरजीत सिंह घाटगेला ते एकट पाडत नाहीत, ते कागलच्या विकासाला एकट पाडत आहेत, असा आरोप त्यांनी मुश्रीफांना केला आहे. समरजीत घाटगे यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
मनधरणीसाठी भाजपचे नेते घाटगेंच्या निवासस्थानी
समरजित सिंह घाटगे यांनी बंडाचं निशाण हाती घेण्याची तयारी सुरू केल्यामुळे, त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते घाटगेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह इतर नेते त्यांच्या भेटीसाठी आले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयासंदर्भात घाटगे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. समरजीत सिंह घाटगे यांची समजूत काढून उद्या होणाऱ्या महायुतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत त्याची मनधरणी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.