Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics  Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial: 'सत्तेची हाव पूर्ण; अजितदादांचा विकास म्हणजे शाहू, फुले आंबेडकरांचा अपमान.. सामनातून टीकेचा बाण

Samana Editorial On Ajit Pawar: विकासाचा दावा बिनबुडाचा आहे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Samana Editorial Today News: मला सत्तेची हाव नाही, मी विकासासाठी सत्तेत गेलो.. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत केले. अजित पवार यांच्या याच विधानावरुन सामनामधून टीका करण्यात आली आहे. अजितदादांचा विकास म्हणजे शाहू, फुलेंचा अपमान असा घणाघात सामना अग्रलेखामधून करण्यात आला आहे. (Maharashtra Politics)

सामना अग्रलेख जशाच्या तसा....

जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत. आता हा विकास आहे असे जर अजित पवारांना वाटत असेल तर ते शाहू , फुले , आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान करीत आहेत .

२०२४ मध्ये सत्ताबदल...

सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी , इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले. ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या (BJP) गोठ्यात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की 2024 मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे. व शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात त्याप्रमाणे "आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील..." महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल, सत्तेची भूक तोपर्यंत सगळय़ांनीच शमवून घ्यावी हाच सगळय़ांना प्रेमाचा सल्ला..

विकासाचा दावा बिनबुडाचा...

बारामतीत (Baramati) जाऊन अजितदादा (Ajit Pawar) असेही म्हणाले की, ”मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत”. मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर झुंजवायचे हा काही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार नव्हता.

विकासासाठी आपण शिंदे-फडणवीस (Shinde- Fadanvis) यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे. अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले?

सत्तेची हाव पुर्ण...

भाजपने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ‘घाव’ घातला म्हणून तुमची ही सत्तेची ‘हाव’ पूर्ण झाली आहे, हे या पक्षांवर बेगडी दावा सांगणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तेव्हा आपल्याला सत्तेची हाव नाही वगैरे अजित पवारांचे बोलणे झूठ आहे. शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार हे कोणत्याही उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकले हे बारामतीत त्यांच्यावर फुले उधळणारी जनताही जाणते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT