Sadabhau Khot On Raju Shetti saam tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot News: 'शेतकऱ्यांची फसवणूक करुन गुलालाची उधळण...' सदाभाऊ खोत यांचा ऊसदर आंदोलनावरुन राजू शेट्टींवर निशाणा

Sadabhau Khot On Raju Shetti: शेतकऱ्यांची फसवणूक करून आंदोलनाला यश मिळाले म्हणून स्वतःच्याच अंगावर गुलाल टाकण्याचे काम केले.

विजय पाटील

Sadabhau Khot News:

ऊस दराच्या आंदोलनावरून राज्यातील दोन शेतकरी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी मला कुण्या लुंग्या सुंग्यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचे म्हणले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर तोफ डागली असून शेतकऱ्यांची फसवणूक करत गुलाल उधळल्याचे त्यांनी म्हणले आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"शेतकरी नेत्याचा वारू गुलालात उधाळाला लागले आहे.. मात्र ऊस उत्पादक मात्र बैचीराख झाला.." अशी खरमरीत टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर (Raju Shetti) केली आहे. सांगली जिल्ह्यातील रेठरे गावात एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

" शेतकऱ्यांची फसवणूक करून आंदोलनाला यश मिळाले म्हणून स्वतःच्याच अंगावर गुलाल टाकण्याचे काम केले. पण हा गुलाल लोकसभे साठी होता. शेतकऱ्याला तुम्ही फसवलं आहे.. पण लोकसभेला बहुजन समाज स्वतःच्या अंगावर उधळेल आणि तुमची जागा दाखवून देईल.." अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली.

ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी १० ऑक्टोंबरपासून जन आक्रोश यात्रेला सुरूवात केली होती. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून गुरूवारी यावर तोडगा निघाला. ऊस दराचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर राजू शेट्टी यांचे ठिकठिकाणी गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. याच जल्लोषावरुन सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT