Sadabhau Khot On Dipak Kesarkar: Saamtv
महाराष्ट्र

Sadabhau Khot: शाळेत शिकत असतानाच मुलं आत्महत्या करतील; खोत यांची मंत्री केसरकरांवर खोचक टीका

Sadabhau Khot On Dipak Kesarkar: शेतकऱ्यांच्या मुलांना शेती शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे शेतीचा विषय शिक्षणात घेऊ नका. या निर्णयाला आमचा विरोध आहे.. असे सदाभाऊ खोत म्हणालेत.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, प्रतिनिधी|ता. १६ जानेवारी २०२४

Sadabhau Khot News:

आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केली होती. दिपक केसरकर यांच्या या निर्णयाला महायुतीमधीलचं शेतकरी नेत्यांनी विरोध केला आहे. या निर्णयावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिपक केसरकरांवर टीका केली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"शेती करताना बाप आत्महत्या करत आहे. आता मुलं शाळेत शिकत असतानाच आत्महत्या करतील याच उद्देशाने दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षणात शेती हा विषय घेण्याचा घेण्याचा विचार केला असावा," अशी खोचक टीका सदाभाऊ खोत (Sadahau Khot) यांनी केसरकर यांच्यावर केली आहे.

तसेच "शेतकऱ्यांच्या मुलांना शेती शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे शेतीचा विषय शिक्षणात घेऊ नका. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्याऐवजी शेतमालाला भाव कसा मिळेल हा विषय अभ्यासक्रमात घ्यावा," अशीही मागणीही त्यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा लढवण्याचीही व्यक्त केली इच्छा...

दरम्यान, यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी महायुतीतून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांतीला देण्याची मागणी केली आहे. मात्र सदाभाऊ खोत यांच्या या मागणीने शिंदे गटाचे टेंन्शन चांगलेच वाढले आहे. कारण सध्या शिंदे गटाचे धैर्यशील माने हे याठिकाणी खासदार आहेत.

मागच्या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मशागत मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र हा गडी (खासदार धैर्यशील माने )चांगला पेहराव करून आला आणि आम्ही केलेल्या मशागतीचा फळ घेऊन गेला, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

SCROLL FOR NEXT