Rohit Pawar Vs Radhakrishna Vikhe Patil Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'रोहित पवार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार...' राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा; प्रकरण काय?

Talathi Bharati 2023: तलाठी भरतीबाबत बेछूट आरोप केले जात असल्याचे म्हणत यामध्ये कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हणले आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. ११ जानेवारी २०२४

Talathi Bharati 2023:

तलाठी भरतीचे निकाल लागल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. तलाठी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून गेले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचाही संशय व्यक्त करत एका जागेसाठी २५ लाख रुपयांची वसूली झाल्याचा धक्कादायक आरोप केले होते. रोहित पवार यांच्या या आरोपांवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हणले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 25 लाखांहून अधिकची वसुली झाल्याचे आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले होते. रोहित पवार यांचे हे आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळून लावले असून तलाठी भरतीबाबत बेछूट आरोप केले जात असल्याचे म्हणत यामध्ये कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच जी मुलं गुणवत्ता यादीत आली त्यांच्यावर अन्याय का करायचा? असा सवाल उपस्थित करत विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून खोटा प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हणले आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण ते देणार का? आणि कुणालाही डॉक्टर करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारची ही दडपशाही युवा मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही युवा बाजूने लढत राहणार.. असेही ते म्हणालेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT