Bacchu Kadu at a political event amid speculation over his possible entry into Shinde Sena. 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Maharashtra MLC Election: बच्चू कडूंना शिंदेसेनेनं ऑफर दिलेली असताना महायुती अस्वस्थता निर्माण झालीय. भाजपला महायुती बच्चू कडू नको आहे, अशीही चर्चा रंगलीय. त्यामुळे भाजप खरचं बच्चू कडूंना शिंदेसेनेत पक्षप्रवेश करण्यापासून रोखणार का? भाजपला कडू का नको आहेत? कडूंच्या पक्षप्रवेशानं शिंदेसेनेला कसा फायदा होणार? पाहूयात यावरचाच स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

विदर्भाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू हे आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेसेनेत विलीन करणाच्या तयारीत आहेत..मात्र या विलिनीकरणामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. बच्चू कडूंचा शिंदेसेनेत पक्षप्रवेश रोखण्यासाठी विदर्भातील नेत्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व शिंदेसेनेवर दबाव वाढवून प्रहारचे विलिनीकरण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे...मात्र महायुतीत भाजपला कडू का नकोत ते पाहूया.

बच्चू कडूंनी भाजप नेते आणि मुख्यमत्र्यांच्या विरोधात सातत्यानं जाहीर टीका केलीय. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी बच्चू कडू यांनी प्रहारच्या झेंड्याखाली उमेदवार उतरवले होते. बच्चू कडूंना ग्रामीण भागात मिळत असलेल्या पाठिंब्यामुले ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

याशिवाय दिव्यांग नागरिकांचा बच्चू कडूंना मोठं समर्थन आहे. बच्चू कडूंसारख्या आक्रमक नेता शिंदेसेनेत गेल्यास भाजपची बालेकिल्ला असलेल्या विदर्भात आणि विशेषत: अमरावतीत डोकेदुखी वाढू शकते.

बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाचं शिंदेसेनेत विलिनीकरण केल्यास महायुतीतली समीकरणंही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडूंच्या शिंदेसेनेतल्या प्रवेशाला खोडा घालण्यात भाजपला यश येणार की शिंदे कडूंना आपल्या पक्षात घेऊन भाजपला विदर्भात शह देणार याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT