Bal Mane Join Shivsena Thackeray Group Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेंकडून सामंतांना तिकीट, भाजपमधून बंडखोरी, माजी आमदार आज मशाल हाती घेणार!

Bal Mane Join Shivsena Thackeray Group: कोकणात भाजपला मोठा धक्का मिळाला आहे. माजी आमदार बाळ माने हे भाजपची साथ सोडणार असून ते मशाल हाती घेणार आहेत. उदय सामंत यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे बाळ माने नाराज झाले आहेत.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेले नेते दुसऱ्या पक्षांमध्ये एन्ट्री करत आहेत. शिंदे गट आणि भाजपकडून नाराज झालेले नेते आणि पदाधिकारी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. अशामध्ये कोकणात भाजपला मोठा धक्का मिळाला आहे. माजी आमदार बाळ माने हे भाजपची साथ सोडणार असून ते मशाल हाती घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमधील भाजपचे माजी आमदार बाळ माने उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीतून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बाळ माने हे नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित झाला आहे. बाळ माने हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे उदय सामंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून बाळ माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. आज सकाळी ११ वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बाळ माने यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार आहे. भाजपचे बाळ माने कमळ सोडून आज मशाल हाती घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT