Raju Shetti On Sadabhau Khot:  Saamtv
महाराष्ट्र

Raju Shetty On Sadabhau Khot: सदाभाऊसारखे लोक अशीच भीक मागतील, राजू शेट्टींचा सणसणीत टोला

Maharashtra Politics: 'मला राज्यपाल करा', अशी मागणी करणाऱ्या सदाभाऊ खोतांवर राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली. 'सदाभाऊसारखे लोक अशीच भीक मागतील.', असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. सध्या त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.

Priya More

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी 'मला राज्यपाल करा', अशी मागणी जाहीर सभेत केली होती. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत सदाभाऊ खोत यांना सणसणीत टोला लगावला. 'सदाभाऊसारखे लोक अशीच भीक मागतील.', अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोतांना टोला लगावला.

राजू शेट्टी यांनी वाशिममध्ये माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोतांवर सडकून टीका केली. 'सदाभाऊ सारख्या लोकांचा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांचा सुतराम संबंध राहिला नाही. त्यामुळे ते असेच भीक मागत फिरतील.' असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे. आता यावर सदाभाऊ खोत नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे राहिल.

सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील विटा येथील एका जाहीर कार्यक्रमात मोठं विधान केले होते. 'कोणी कितीही देव पाण्यात ठेवू दे, देवाभाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार. मात्र मला कुठं तरी राज्यपाल तरी करा, नाही तर आपली अवस्था बंद बॅडवाल्यासारखी होईल.', अशा मिश्कील शब्दात सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमध्ये होणारी घुसमट व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

सदाभाऊ खोत यांनी या सभेमध्ये 'माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील. आपल्याला किमान राज्यपाल तरी करा.', अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर या सभेला उपस्थित असलेल्यांमध्ये आणि व्यासपीठावर असलेल्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. दरम्यान, सध्या महायुतीमध्ये अनेकांची घुसमट सुरू आहे. अशामध्ये सदाभाऊ खोतांनी ही घुसमट बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT