Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Sangli News : लाडक्या बहिणींच्या नव्या शासन निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली.
Raju Shetty
Raju ShettySaam tv
Published On

सांगली : राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला आहे. मात्र आता लाडक्या बहिण योजनेचा नवीन निर्णय काढण्यात आला आहे. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली असून तुम्ही रामाचे भक्त आहात; त्यामुळे सरसकट सर्व बहिणींना लाभ द्या; अशी मागणी त्यांनी केली आहे. 

लाडक्या बहिणींच्या नव्या शासन निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महायुती सरकारवर टीका केली. शेट्टी यांनी म्हटले आहे कि शासनाच्या नव्या अध्यादेशात अनेक नियम लावलेले आहेत. हे नवे नियम पाहता केवळ २२ टक्के बहिणी योजनेसाठी पात्र ठरतील. मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले आणि आता मात्र त्यांची मते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये (Ladki Bahin Yojana) निकष लावून आवडते आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव करण्याचे काय कारण? असा सवाल त्यांनी केला आहे. 

Raju Shetty
Bhusawal News : विजेचा झटका लागून वायरमन खांबावरून कोसळला; दुरुस्तीचे काम करताना घडली दुर्घटना

भाऊबीज परत घेणे शोभत नाही 

तर सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिलेली आहेत. असा सरकारचा दावा आहे. दिवाळीत भाऊबीज ताटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची हे तुम्हाला शोभत नाही. त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com