Maharashtra Politics: 'विधानसभेला आम्ही ३० ते ३५ जागा लढवू', स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी रणशिंग फुंकले!
Raju Shetti|Maharashtra Vidhansabha Election 2024:  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'विधानसभेला आम्ही ३० ते ३५ जागा लढवू', स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी रणशिंग फुंकले!

Gangappa Pujari

संजय सूर्यवंशी, नांदेड|ता. १ जून २०२४

लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेसाठी महायुती, महाविकास आघाडीसह घटक पक्षांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मोठे विधान केले असून निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला सध्या मोठा विरोध पाहायला मिळत आहे. विदर्भ, कोकण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेतेही या महामार्गाविरोधात आक्रमक झाले आहेत. याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

"शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही. कोल्हापूर - नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे. मग या महामार्गाची गरज काय? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याच्या केवळ 40% मोबदला मिळणार आहे. सभागृहात चर्चा झाली. परंतु चर्चा ताकतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. माझा सर्व पक्षीय नेत्याच्या भूमिकेवर संशय आहे," असेही राजू शेट्टी म्हणाले.

यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे विधान केले. "आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 30 ते 35 जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही," असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma:शतकी खेळीनंतर अभिषेक शर्माने 'गुरू' युवराज सिंगला केला व्हिडिओ कॉल! काय चर्चा झाली? पाहा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar News: खळबळजनक! अज्ञात व्यक्तींनी केली सुरक्षा रक्षकाची हत्या, परिसरात भीतीचं वातावरण

Marathi Live News Updates : कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेले पाणी ओसरले, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू

Shruti Marathe: श्रुती मराठेचा किलर अंदाज ,Photos पाहा

Kokan Rain Update: कोकणासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT