Raju Shetty Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ...तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना भरसभेत तुडवा, शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetty On Maharashtra Government: शेतकरी नेते राजू शेट्टी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी हे सरकार इंग्रजांपेक्षा भयंकर अशा शब्दात टीका केली.

Priya More

'जिथे जिथे ताफा घेऊन मंत्री फिरतील तिथे तिथे भरसभेत महाराष्ट्रामधील मंत्र्यांना तुडवा.', असे खळबळजनक विधान शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. राजू शेट्टी यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पांठिंबा दिला. यावेळी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. बच्चू कडू गेल्या ५ दिवसांपासून उपोषण करत आहेत पण अद्याप त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही त्यामुळे राजू शेट्टी संतप्त झाले.

राजू शेट्टी यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. 'पैसे नाही तर मग ६५ हजार कोटी खर्च करून समृद्धी महामार्ग कसा बांधला? हे सरकार म्हणते २०२८ मध्ये कर्जमाफी करू. पुन्हा २०२९ मध्ये सत्तेत येण्याचा यांचा डाव आहे. या कर्जाची जबाबदारी घ्या. सरकारला कर्जमुक्त करा. लाखो कोटीची प्रकल्प कसे उभे करता?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, 'जिथे जिथे ताफा घेऊन मंत्री फिरतील तिथे तिथे भर सभेत महाराष्ट्रामधील मंत्र्यांना तुडवा.', असे आवाहन राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना केले आहे.

यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला इशाराच दिला. त्यांनी सांगितले की, 'विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं आणि सत्तेत आलं की शेतकऱ्यांबदल बोलायचं नाही. बुलेट ट्रेन प्रकल्प बंद करा. शक्तीपीठ महामार्ग काम बंद करा. आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. बच्चूभाऊ सातबारा कोरा केलाशिवाय मागे हटू नका. सरकारने जर आजच्या बैठकीत किंवा उद्या निर्णय घेतला नाही तर शनिवारपासून रस्त्यावर चिटपाखरू देखील फिरू देणार नाही. आता ही लढाई आरपारची आहे.'

तसंच, 'हे आंदोलन न्याय मागणाऱ्या सर्व सामन्य जनतेचं आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला पाहिजे. पाच दिवस झाले पण सरकारला दया येत नाही. इंग्रजांचे राज्य होते म्हणून गांधीजी यांनी अन्नत्याग केलं होतं. हे सरकार इंग्रजांपेक्षा भयंकर आहे. यांना अजिबात आत्मक्लेश करायला वेळ नाही. वाळू माफियाच्या वाढदिवसाला पालकमंत्री हेलिकॉप्टर ने येतात पण बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यायला वेळ नाही. लाज वाटली पाहिजे. या सरकारला सर्वसामान्य माणसाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.', असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT