raj thackeray and uddhav thackeray X
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकं काय बोलणं झालं? भेट कुठे अन् कधी होणार?

Raj and Uddhav to Meet Again: राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून गणपती दर्शनासाठी आमंत्रण दिलं. या निमंत्रणानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र भेटणार आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

Bhagyashree Kamble

  • राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून गणपती दर्शनासाठी आमंत्रण दिलं.

  • या निमंत्रणानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र भेटणार आहेत.

  • या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

  • आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेना-मनसे एकत्र येणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खास आमंत्रण दिलं आहे. मराठी विजयी मेळावा आणि उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस या पार्श्वभूमीनंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीची चर्चा रंगत आहे. हिंदी सक्तीविरोधात मराठी अस्मितेसाठी दोन्ही बंधू एकत्र आले होते आणि शासनाला जीआर रद्द करावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चेला उधाण आलं असलं तरी, अद्याप दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे युतीसंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, भाषणं आणि पत्रकार परिषदांमध्ये दोघेही सकारात्मक संकेत देत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांसह एकूणच राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण आहे.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला. शंशाक राव यांच्या पॅनेलनं तब्बल १४ जागा जिंकून बहुमत मिळवलं. या पराभवानंतर राज ठाकरे यांनी हा विषय लहान असल्याचं सांगत, निवडणुकीवर भाष्य करण्याचं टाळलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : आजोबा म्हणायची त्याने इज्जत लुटली, चिमुकलीवर बलात्कार करून विष पाजलं

Maharashtra Live News Update : वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

Maharashtra politics : नालायक वृत्तीला विरोधच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा पुन्हा हल्लाबोल, नवी मुंबईतला वाद पेटला

Maharashtra Politics : ठाण्यातून मनसे- मविआच्या युतीचा शुभारंभ? ठाण्यात विरोधकांची रणनिती ठरली?

Neech Bhang Rajyog: 12 महिन्यांनी बनणार 'नीचभंग राजयोग'; शुक्रदेव 'या' राशींचं नशीब पालटणार

SCROLL FOR NEXT