Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'काही दिवसांनी संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम होईल...'; विखे पाटील यांची विखारी टीका

Maharashtra Politics: सत्ता गेल्याचं एव्हढं वैफल्य बरोबर नाही. या वैफल्यातून काही दिवसांनी संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम होईल, असं टीकास्त्र महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील संजय राऊत यांच्यावर केलं आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics

संजय राऊत यांचीच नैतिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांची वक्तव्य खालच्या पातळीची असून त्यांनी थोडं तारतम्य ठेवून वागावं. अन्यथा त्यांच्ं कर्तुत्व त्याच पातळीवर जाऊन जाहीर करावं लागेल. सत्ता गेल्याचं एव्हढं वैफल्य बरोबर नाही. या वैफल्यातून काही दिवसांनी संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम होईल, असं टीकास्त्र महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील संजय राऊत यांच्यावर केलं आहे. संजय राऊत यांनी राज्याचं सरकार तीन घाशीराम कोतवाल चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे विखेंनी त्यांच्यावर आज निशाना साधला.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी मतदारसघांतील साकुरी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नऊ वर्षात विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे महत्त्वाचं काम करण्यात आलं आहे. सर्व समाज घटकांपर्यंत योजना नेण्याचे काम आम्ही करत असून अहमदनगर जिल्ह्यात संकल्प यात्रेच्या स्वागतासाठी प्रचंड उत्साह मिळत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. समृध्दी शेतकरी निळवंडे पाण्यावरून सुरू असलेल्या रास्तारोकोवर बोलताना ते म्हणाले, सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना पाणी मिळावे यासाठी तेथील लोप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व भागात पाणी पोहचवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकतेच जलपूजनही झाले. मात्र काही भाग पाण्यापासून वंचित राहिला असेल तर चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

संजय राऊत यांनी राज्याच सरकार तीन घाशीराम कोतवाल चालवत आहेत. त्यामुळे त्यांना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. यांच्या सरकारमधील सर्वच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून खटले सुरू आहेत आणि हे लोकांकडे बोट दाखवतायेत. असा घणाघात प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. त्याचा विखे पाटलांनी जोरदार समाचार घेतला. संजय राऊतांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. पक्षाची भूमिका जनतेसमोर आहे. संजय राऊतांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही बांधील नसल्याचे ते म्हणाले.

तसेच संजय राऊत यांचीच नैतिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांची वक्तव्य खालच्या पातळीची असून त्यांनी थोडं तारतम्य ठेवून वागावं, बोलावं. अन्यथा त्यांचे कर्तुत्व त्याच पातळीवर जाऊन जाहीर करावं लागेल. सत्ता गेल्याचे एव्हढे वैफल्य बरोबर नाही. या वैफल्यातून काही दिवसांनी संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम होईल, अशी टीका त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT