Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'आरक्षण देण्याचे अनेक मार्ग, पण सरकार..., मराठा आरक्षणावरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Maharashtra Lok Sabha Election 2024: मराठा आरक्षणासंर्भात सरकारने वारंवार तारखा दिल्या आहेत. जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली पाहिजे, यासाठी बरेच मार्ग आहेत परंतु महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मागणी पूर्ण करायची आहे की नाही की हा प्रश्न आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Sandeep Gawade

ओंकार कदम

Maharashtra Politics

तुम्हाला पुरावे सादर करावे लागत आहेत यातच सर्व आलं आहे. ज्याच्या विषयी मनात शंका निर्माण होते, असेल नसेल असा प्रश्न निर्माण होतो त्यांना पुरावे सादर करावे लागतात, त्याच्यातच आमचं यश आहे. बाबरीचा ढाचा पाडण्यात कोण होत. त्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकमेव होते की जे म्हटले होते यामध्ये आमचा शिवसेना कार्यकर्ता असेल तर त्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे शिवसेनेला या गोष्टी भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे लगावला आहे.

मराठा आरक्षणासंर्भात सरकारने वारंवार तारखा दिल्या आहेत. जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली पाहिजे, यासाठी बरेच मार्ग आहेत परंतु महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मागणी पूर्ण करायची आहे की नाही की हा प्रश्न आहे. समाजा समाजामध्ये भांडणं लावायची आहेत का? असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या भूमिकेला शिवसेनेचा कायम पाठिंबा राहिलेला आहे, असं ते म्हणाले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान पाळावं असं सांगणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखं आहे. अजित पवारांनी खरंतर जरांगे पाटलांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. जरांगे पाटील मराठा समाजाविषयी भूमिका मांडतात आणि समाज त्यांच्या मागे एकवटत आहे. त्यांचा अवमान अजित पवारांनी करू नये, अशी माझी विनंती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT