Shahaji Bapu Patil, Sangola,  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का! ९ पुतणे शरद पवार गटात प्रवेश करणार?

Sangola News: शहाजी पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश कणार आहेत. आज पुण्यामध्ये संग्रामसिंह पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी|ता. २४ मार्च २०२४

Maharashtra Politics News:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. शहाजी पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश कणार आहेत. आज पुण्यामध्ये संग्रामसिंह पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचे पुतणे संग्राम पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. संग्रामसिंह पाटील हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तसेच काही दिवसात स्वतः शहाजी बापू पाटीलही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील, असे मोठे विधानही संग्राम पाटील यांनी केले आहे.

काय म्हणाले संग्राम पाटील?

"शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगोल्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊ असे सांगितले आहे. त्यानुसार पक्ष प्रवेशाचे नियोजन ठरवले जात आहे. शरद पवारांकडे पूर्ण काका ग्रुपचं येणार आहे. ९ पुतणे येतील आणि त्यानंतर हळू हळू काका पण पाठीमागे येतील. झाडी डोंगर बघून झालं. त्यांचं वास्तवाचे भान त्यांना आता आलंय, ते परतीच्या प्रवासाला लागतील, असे म्हणत गुवाहाटीला जाऊन मतदान मिळत नाही, काकाही येतील त्यांच्याकडे पर्याय नाही," असा टोलाही संग्रामसिंह पाटील यांनी लगावला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, आज पुण्यामध्ये वर्ध्याचे नितेश कराळे गुरूजी यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. मी वर्ध्यामधून लोकसभा लढण्यास इच्छुक आहे. अमर काळे तयारीला लागले पण अजून अंतिम निर्णय झाला नाही. ते काँग्रेस चे नेते आहेत पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गेली आहे. अमर काळे यांची काय गॅरंटी?माझा पक्ष प्रवेश अजून बाकी आहे. मी शेवट पर्यंत एकनिष्ठ राहील असा शब्द दिला आहे, असे नितेश कराळे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT