Mahayuti  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सत्ताधारी नेत्यांवर राज्य सरकार मेहरबान! अशोक चव्हाणांसह ११ नेत्यांच्या साखर कारखान्यांवर शेकडो कोटींची मदत

Maharashtra Politics: सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे. भाजपसह सत्तेतील मित्रपक्षांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना भरघोस निधी दिल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Politics News:

सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपामध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे. भाजपसह सत्तेतील मित्रपक्षांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना भरघोस निधी दिल्याचे समोर आले आहे.

नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.

सध्या काँग्रेसमध्ये (Congress) असलेले आणि भाजपला सातत्यानं मदत होईल अशी भुमिका घेणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्यालाही 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यामुळेच सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, याआधी राष्ट्रिय सहकारी विकास निगमचा माध्यमातुन भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान दिले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने

१) भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मी नगर नांदेड - 147.79 कोटी

व्यवस्थापन- अशोक चव्हाण

२) संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर - 59.49 कोटी

व्यवस्थापन - धनाजीराव साठे

३) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर- 146.32 कोटी रुपये

व्यवस्थापन - कल्याणराव काळे

४) छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर- 128 कोटी रुपये

व्यवस्थापन- प्रशांत काटे

५) जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, बीड- 150 कोटी रुपये

व्यवस्थापन - अमरसिंह पंडित

(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

SCROLL FOR NEXT