Maharashtra politics sharad pawar ajit pawar ncp x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार! रोहित पवारांचं सूचक वक्तव्य

Maharashtra Political News : शरद पवार गट आणि अजित पवार गट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार असल्याचे संकेत आमदार रोहित पवारांनी दिले आहेत. भंडाऱ्यात रोहित पवार बोलत होते. M

Yash Shirke

  • राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात...

  • आमदार रोहित पवारांनी दिले संकेत

  • अजित पवारांसमोर ठेवली फक्त एक अट

Maharashtra : मराठीच्या मुद्द्यावरुन राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनी एकत्र आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते एकत्र दिसणार, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांमध्ये युती होणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. या संदर्भात आमदार रोहित पवारांनी वक्तव्य केले आहे. अजित दादांनी जर भाजप सोडली, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकतात असे रोहित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २०२३ मध्ये फूट झाली. फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु होती. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार यावर भाष्य केले आहे.

रोहित पवार म्हणाले, 'लोकांची इच्छा असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा असेल, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येतील. पण त्यासाठी अजित पवार यांना भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी लागेल. अजित दादांनी भाजपची साथ सोडली, तर कदाचित सर्वजण एकत्रित येऊ शकतो. ते जर भाजपसोबत आहेत, तर सर्व एकत्रित होणे अवघड होऊ शकते, असे मला वाटते.'

सामान्य जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि युवा बेरोजगारांचे प्रश्न यासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकरी मोर्चा आणि मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये रोहित पवार यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमादरम्यान रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणावरुन वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

Chirote Recipe : दिवाळीत बनवा मऊसूत- खुसखुशीत चिरोटे, एक घास खाताच गावाची आठवण येईल

Sonakshi Sinha : कतरिनानंतर सोनाक्षी सिन्हा देणार गुडन्यूज? 'तो' VIDEO पाहून सोशल मीडियावर रंगली प्रेग्नेंसीची चर्चा

SCROLL FOR NEXT