Nirmala Navale appointed NCP state youth president  
महाराष्ट्र

NCP Reshuffle: सुनेत्रा पवारांनी भाकरी फिरवली; निर्मला नवले यांच्यावर राष्ट्रवादी पक्षानं दिली मोठी जबाबदारी

NCP Reshuffle: संघटनात्मक पातळीवरील एका महत्त्वपूर्ण फेरबदलांतर्गत, राष्ट्रवादी काँग्रेसने निर्मला नवले यांची प्रदेश युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे त्यांना महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत नेतृत्वाची एक महत्त्वाची भूमिका मिळाली आहे.

Bharat Jadhav

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली.

  • संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे महत्त्वाची राज्यस्तरीय जबाबदारी सोपवण्यात आली.

  • राज्यातील युवती संघटना अधिक मजबूत करण्यावर नव्या नेतृत्वाचा भर राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केली जात आहेत. पक्षाच्या रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे, तर विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर आज युवती आघाडीच्या नेतृत्त्वात मोठा बदल करण्यात आलाय.

सुनेत्रा पवार यांनी युवती आघाडीच्या प्रदेश अध्यक्षापदी एका पराभूत झालेल्या उमेदवाराला बसवून एक मोठा विश्वास दर्शवलाय.पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. याआधी युवतीचे प्रदेशाध्यक्षापद बीड जिल्ह्यातील संध्या सोनवणे यांच्याकडे होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात निर्मला नवले यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. निर्मला नवले यांनी याआधी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील युवतींशी थेट संवाद साधून संघटन मजबूत केले. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण राज्यातील युवतींचे सक्षम संघटन उभारणे आणि नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्याची मुख्य जबाबदारी आली आहे.

सरपंच ते युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद

निर्मला नवले यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावचे सरपंचपद भूषवले आहे. स्थानिक पातळीवर म्हणजेच ग्रामीण भागात त्यांनी तरुण आणि महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी मोठे काम केले आहे. उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या निर्मला शुभम नवले यांनी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला होता.

अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या निर्मला नवले यांनी 2021 मध्ये कारेगावच्या सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या कारेगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : जेवणानंतर पोट फुगतंय आणि गॅस होतोय? 'या' एका पाण्याने मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update: शाळकरी विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक, भंडारा - रामटेक महामार्गावरील घटना

शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंनी तीन शब्दांत विषय संपवला

मुंबई-पुण्यातील वाहन नंबर सिरीज संपली; तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळणार; कुठे आणि कसा कराल अर्ज?

लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹25,000 बेसिक पगार असलेल्यांनाही मिळू शकतो पेन्शनचा लाभ; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

SCROLL FOR NEXT