सोलापूर, ता. २२ सप्टेंबर
Ajit Pawar On Umesh Patil: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या मोहोळमध्ये राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पार पडत आहे. अजित पवार यांच्या या दौऱ्याआधीच राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. 'दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही' असे म्हणत अजित पवार गटाचेच मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली होती. यावरुनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सभेतून उमेश पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही उमेश पाटील यांचा समाचार घेतला. या राड्यावरुन राष्ट्रवादीमध्येच वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवारने आखलेला दौरा रद्द करणारा अजून जन्माला येणार आहे. मागे कोणी म्हणांल होत मी अजित पवारांचा दौरा रद्द केला. कुत्रं कस गाडीच्या खाली चालतं आणि त्याला वाटत मीच गाडी चालवतो,अरे तू गाडीची घंटा हलवतो काय? अशा शब्दात मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा नाव न घेता अजित पवार यांनी सडकून टीका केली. तसेच पक्ष शिस्तीत चालेल बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांच्यावर टीका कराल तर त्याला जागा दाखवू, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही उमेश पाटील यांना खडेबोल सुनावले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी व्यासपीठावरुन उमेश पाटील यांची तक्रार केली. 'मोहोळ मतदार संघात मेळाव्याचा, कार्यकर्त्यांचा वापर करून बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढली. आपल्या तालुक्यात एकच व्यक्ती आहे, जो विरोधकांशी संधान साधून माझ्यावर आणि राजन पाटील यांच्यावर टीका करतो, त्या वक्तीवर कारवाई करावी,' अशी मागणी यशवंत माने यांनी केली.
दरम्यान, अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करावे या मागणीसाठी आम्ही उद्या बंदची हाक देत आहोत. अजित पवार हे माझे नेते असले तरी मोहोळ तालुक्यातील जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी हा बंद पुकारला आहे. अनघर अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे ही भावना अजितदादापर्यंत जावी म्हणून मोहोळ बचाव संघर्ष समितीने हा निर्णय घेतला, असे म्हणत उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली होती. मात्र यावरुनच आता राष्ट्रवादीत कलह निर्माण झाल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.