Parth Pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पार्थ पवारांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी राष्ट्रावादीकडून लॉबिंग सुरू; राजकीय हालचालींना वेग

Parth Pawar Union Minister: राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहेर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय.

Bharat Jadhav

  • पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू

  • राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचं सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलं.

  • या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. पार्थ पवार यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांना मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून लॉबिंग सरू करण्यात आली आहे. (NCP Parth Pawar in Race for Union Ministry? NCP Leaders Step Up Efforts)

राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहेर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून खासदार पार्थ पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. हे पत्र १३ जुलै २०२६ रोजीचे आहे. यात पार्थ पवार यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलीय. त्यांच्या विविध गुणांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशभरातील विस्तारावर प्रकाश टाकण्यात आलाय.

पार्थ पवार युवा नेतृत्वाचा चेहरा

पार्थ पवार हे युवा नेतृत्वाचा चेहरा आहेत आणि त्यांना केंद्रात संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देशभर विस्तार होण्यास मदत होईल. तसेच पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी विनंतीही या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय, असा दावा उदयकुमार निंबाजी आहेर यांनी लिहिलेल्या पत्रात केलाय.

तरुणांना संवाद साधण्याची क्षमता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांच्या पत्रात पार्थ पवार यांच्या बाजूने अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. पार्थ पवार यांची तरुण प्रतिमा, हिंदी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, लंडनमधील उच्च शिक्षण, राष्ट्रीय स्तरावर पक्ष बळकट करण्याची आणि तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrit Bharat Express: जळगावमार्गे धावणार नवी अमृत भारत एक्सप्रेस! धुळे आणि अमळनेर भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

Gold Price: ग्राहकांना झटका! सोनं-चांदी आणखी महागणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: उधना पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे लवकरच धावणार

Soaked Cashews Benefits: रोज सकाळी उपाशी पोटी भिजवलेले काजू खा; शरिराला मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदेशीर

फाईल अडवणाऱ्यांची आता खैर नाही! दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; सरकारी कामकाजासाठी नवे निर्देश

SCROLL FOR NEXT