Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महापालिका निकलाच्या काही तास आधीच नाशिकमध्ये चक्र फिरले; दिग्गज नेत्याचा राजीनामा

Nashik Municipal Corporation Sharad Pawar Candidate Gajanan Shelar Resign: नाशिकमध्ये महापालिकेच्या निकालाआधीच चक्र फिरले आहे. शरद पवार गटाचे नाशिकचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांची राजीनामा दिला आहे.

Siddhi Hande

नाशिकच्या राजकारणाची चक्र फिरली

महापालिका निकालाआधीच शरद पवार गटाला मोठा धक्का

शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा

आज राज्यातील २९ महापालिकांचे निकाल आहेत. जवळपास ८-९ वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. याच निवडणुकीच्या निकालाआधी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकचेशरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलारांनी राजीनामा दिला आहे.

गजानन शेलारांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. परंतु त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. निवडणूक काळात पक्षाच्या बड्या नेत्यांनी नाशिकात सभा न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे.

शेलारांच्या निवडणूक काळातील कामगीरीवर पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होते. गजानन शेलार यांचे पुतणे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी भाजपचा प्रचार केल्याचीही चर्चा सुरु होती. शेलार यांचा पुतण्या राहुल शेलार भाजपकडून प्रभाग 13 मध्ये रिंगणात आहेत. त्यांनी राहुल शेलारांचा प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यांनी हकालपट्टी होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

गजानन शेलार यांच्या राजीनाम्यामुळे अनेक चर्चा होताना दिसत आहे. गजानन शेलार भविष्यात कोणत्या गटात प्रवेश करणार, त्यांची राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या काही तास आधीच त्यांनी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता निवडून आल्यावर गजानन शेलार काय करणार असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

Maharashtra Live News Update : शिवभक्तांचे वाहन उलटले; एक ठार, १७ जण जखमी

धक्कादायक! माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं

SCROLL FOR NEXT