Maharashtra Political News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेनंतर काँग्रेसला अच्छे दिन, नाना पटोलेंनी मुख्यमंत्री व्हावं; ठाकरेंची भर बैठकीत इच्छा

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार असून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी भरबैठकीत बोलून दाखवली.

Satish Daud

Political News Updates in Marathi: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार असून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी भरबैठकीत बोलून दाखवली. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ, असं विधानही त्यांनी केलं. विकास ठाकरे यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याआधी बोलून दाखवली आहे.

रविवारी (ता २२) नागपूर येथे नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीत नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असे भाविक अनेक नेत्यांनी केले. विकास ठाकरे यांनी तर भाषण करताना मोठं विधान केलं.

आमदार विकास ठाकरे म्हणाले की, "राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नाना पटोले यांनी कुठलीही तमा न बाळगता विधानसभा अध्यक्षपद सोडलं. काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा हातात आल्यानंतर ते संपूर्ण राज्यभर फिरले. त्यांनी घरदार सोडून मोठी मेहनत केली. यामुळे काँग्रेसला (Congress) अच्छे दिन येणार असून त्याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळायलाच हवा"

जर नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला नाही तर आम्ही विदर्भवाले तो हिसकावून घेऊ.वेळ आली तर त्यांच्यासाठी लढाई लढू. यावेळी विकास ठाकरे यांनी थेट कार्यकर्त्यांना देखील सवाल विचारला. नाना पटोले यांना मोठा मान मिळायला हवा. त्यांनी कुठेतरी वरचा पदावर गेले पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का? असं विकास ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या प्रश्नाला देखील कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. नाना पटोले भावी मुख्यमंत्री अशा घोषणा काही कार्यकर्त्यांनी दिल्या.

"काँग्रेसचा मुख्यमंत्री हायकमांड ठरवणार"

दरम्यान, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस पक्षाच्या अशा प्रकारची भूमिका असेल तर त्यासंदर्भात हायकमांड आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस तेथूनच निर्णय होईल, असं संजय राऊत म्हणाले. जर मुख्यमंत्रीपद हिसकावून घेऊ असे काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असेल तर नाना पटोले यांच्या प्रतिमेला डॅमेज आहे असे मी समजतो, असा टोलाही संजय राऊतांनी हाणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Travel : स्वर्गाहून सुंदर जगातील 'हे' ठिकाण, आयुष्यात एकदा भेट द्याच

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळली; वाहन अक्षरश: चक्काचूर, दोघांचा मृत्यू

IPL Auction, Priyansh Arya: 6 चेंडूत 6 षटकार मारणारा प्रियांश झाला करोडपती! 30 लाख बेस प्राईज अन् लागली 3.80 कोटींची बोली

Maharashtra News Live Updates: अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होणार?

IPL Auction: अदला -बदली! लाईव्ह ऑक्शनमध्ये MI अन् RCB मध्ये सिक्रेट डिल; Will Jacksला घेताच अंबानींनी थँक यू म्हटलं

SCROLL FOR NEXT