OPERATION TIGER: THACKERAY CAMP OR SHINDE CAMP? OMRAJE NIMBALKAR SPEAKS OUT AMID DEFECTION BUZZ saam tv
महाराष्ट्र

Operation Tiger: ठाकरे गट की शिंदे गट? बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

MP Omraje Nimbalkar : खासदार शिंदे गटात सामील होत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी 'ऑपरेशन टायगर'बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.

Bharat Jadhav

  • ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

  • ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

  • ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.

एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरच्या मोहिमेमुळे राज्यासह देशातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करत शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अद्यापही राज्यातील राजकारणाचा पडाव पडला नाहीये. त्याचे कारण म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर हे अद्याप फुटीर गटात सामील झाले नाहीत. आज ते गोवर्धनवाडी गावातील घरी आले आहेत. तेथे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर आपला निर्णय देणार आहेत.

ठाकरे गटात राहणार की शिंदे गटात जाणार?

गोवर्धनवाडी गावात पोहोचण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी टीकाकारांना खडेबोल सुनावले. मी निष्ठावान असूनही माझ्यावर नको ते आरोप करण्यात आल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. दरम्यान त्याआधी आदित्य ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात चर्चा झाली आहे, असं सांगितलं जात आहे. पुण्यात वरूण सरदेसाई यांनी निंबाळकर यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. त्यातच आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आता ओमराजे पुन्हा ठाकरेंकडे परतणार का? अशी चर्चा सुरू झालीय. यावरून आदित्य ठाकरेंनीही भाष्य केलंय. , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन खूप मोठे आहे. जे कोणी मोठ्या मनाने पक्षात पुन्हा परतू इच्छितात, त्यांचे स्वागत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

आधी कार्यकर्त्यांशी चर्चा मग घेणार निर्णय

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय. आपण अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि मग निर्णय घेईल अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी घेतलीय. दरम्यान ते आज धाराशिव येथील गोवर्धनवाडी येथे आले आहेत. तेथे ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

त्यानंतर ते राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर गोवर्धनवाडीतील आपल्या निवासस्थानी दाखल झालेत. ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ओमराजे यांचे फोटो हातात घेवून कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. ओमराजे निंबाळकर त्यांचे वडील स्व.पवनराजे निंबाळकर यांच्या समाधीचे दर्शन घेणार त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेत पराभव का झाला?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे काम करणारे पदाधिकारी तेथे पराभूत झालेत. आपल्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा पराभव स्वीकारावा लागला. हे दुर्दैवी आहे. त्यामुळे तेथील सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे, नेमकं काय त्यांचं मत आहे, हे लोकप्रतिनिधी म्हणून आपण तपासणं गरजेचे असलल्याचं निंबाळकर म्हणालेत. मक आपलं काय चुकतंय, सगळ्याला कोण जबाबदार आहे काय? हे तापसलं पाहिजे,असंही ते म्हणाले.

विकासनिधी मिळत नाहीये -ओमराजे निंबाळकर

विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना कसल्याच पद्धतीचे त्या ठिकाणी विकास काम करायचेत. आम्हाला काय आमच्या कुणाच्या वैयक्तिक घरातली करायचे नाहीत. आम्ही लोकप्रतिनिधी असल्यानं आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. व्यवसाय बघून मी राजकारण करतो बिलकुल नाही माझा 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी आहे मग सामान्य शेतकरी अपेक्षेने माझ्याकडे येतात कुणाच्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवायचा असते कुणाला वाटत किंवा शेतातला एखादा रस्ता व्हावा कुणाला वाटत गावांतर्गत एखादा रस्ता व्हावा,

या अपेक्षा सामान्य जनतेच्या माफक आहेत ना, मला वाटत त्या अपेक्षेसाठी सुद्धा जर आम्हाला त्या ठिकाणी तरतूद केली जात नसेल आमची कुचमणा होत असेल आणि आमच्यामुळे त्या मागणाऱ्या माणसाची कुचमणा होत असेल तर मला वाटत दुर्दैवी आहे, ना एक ट्रान्सफॉर्मर त्या शेतकऱ्याचा बसवण्यासाठी सुद्धा सुद्धा जर निधी त्या ठिकाणी दिला जात नसेल आडवणूक होत असेल तर मग नेमकं काय करावं? असा सवाल निंबाळकर यांनी केला आहे.

'3 दिवसांत नुसत्याच चर्चेनं वाईट झालो का?'

गोवर्धनवाडीकडे जाताना सोलापूरच्या बार्शी मतदारसंघातील शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत केले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टीकाकारांना खडेबोल सुनावलेत. ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं ते टीकेचे धनी बनले. त्याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांवर शाब्दिक हल्लाबोल करण्यात आला.

यावरून ओमराजे निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला. मला रिलस्टार म्हणून हिणावण्यात आलं. जनतेचं काम केलं तरी तर टीका करण्यात आली. घरच्यावर खालच्या पातळीत टीका टिप्पणी करण्यात आली. फक्त तीन दिवस चर्चा सुरू होती. निष्ठावंत होतो, कामाचा नेता होतो तर नुसत्या चर्चेने तीन दिवसातच वाईट झालो का? असा सवाल निंबाळकर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Debt Relief: कर्जापासून सुटका हवी असेल तर आत्ताच करा या मंत्राचा करा जप

उकाड्यानंतर पुण्यात पावसाची एंट्री; वातावरणात गारवा|VIDEO

LPG Rule Change: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा की झटका?

ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराची मुलगी मातोश्रीवर दाखल; पडद्यामागे काय घडतंय? VIDEO

प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज आणि जळजळ होतेय? मग 'हे' घरगुती 5 उपाय करून पाहा

SCROLL FOR NEXT