Raj Thackeray Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Gangappa Pujari

विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातही राज ठाकरेंनी विधानसभेच्या जागांची चाचपणी केली. आजपासून मनसे अध्यक्ष नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. प्रत्येक भागात जाऊन विधानसभेचा कानोसा घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. पुढील दोन आठवड्यात मनसेचे उमेदवार जाहीर होतील, अशी माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे करणार उमेदवारांची घोषणा..

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. येत्या काही दिवसात विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याने राकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपासाठी महायुती तसेच महाविकास आघाडींमधील घटक पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. जागा वाटपावरुन वादाचे फटाकेही फुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे विधानसभेला एकला चलो रे चा नारा दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभेची पद्धतशीर रणनिती आखली आहे.

पुढील आठवड्यात मनसे मेळावा...

स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. अशातच आता पुढील आठवड्यात मनसेच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेचा कार्यकर्ता मेळावा पुढील आठवड्यात पार पडणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार असून उमेदवारांची घोषणाही होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १३ किंवा १४ ऑक्टोबरला मनसेचा मेळावा होणार आहे. याचदिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले उमेदवार जाहीर करतील, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मविआ, महायुतीचे जागा वाटप कधी?

दरम्यान, दसऱ्यानंतर महाविकास आघाडीचेही जागा वाटप जाहीर होईल, अशी माहिती समोर आली आहे. मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येऊ, जागा वाटप लवकरच जाहीर करु, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही येत्या काही दिवसात जाहीर होऊ शकतो.

दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र जागा वाटपावरुन वादाचे फटाके अन् नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची ऑफर दिल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये भाजप १५५ ते १६० जागा लढण्यावर ठाम आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ६० च्या आसपास जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच जागा वाटपात शिंदे गटाला वेगळा निकष लावल्याचा आरोप अजित पवार गटाकडून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT