Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; सरकारला दिला नवा अल्टीमेटम, म्हणाले ३० सप्टेंबरच्या आत...,

Manoj Jarange Patil ultimatum to Government over Farmers loan issue : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय. यावेळी त्यांनी सरकारला ३० सप्टेबरपर्यंत अल्टीमेटम दिल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घरलंय. आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून सरकारला नवा अल्टीमेटम दिलाय. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

मनोज जरांगे यांचा सरकारला अल्टीमेटम

मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ३० सप्टेंबरच्या आत करा, अशी मागणी केलीय. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी त्यांनी सरकारला ३० सप्टेबरपर्यंत मुदत दिलीय. सरकार ३० सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही, बघतोच असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी (Maharashtra Politics) दिलाय. यावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासोबतच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी देखील जरांगे पाटील आक्रमक झाले असल्याचं पाहायला (Jalna News) मिळतंय.

शेतकऱ्यांचे प्रश्न

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला नवा अल्टीमेटम दिलाय. ३० सप्टेंबरच्या आत शेतकऱ्याची कर्जमुक्ती करण्याची त्यांनी मागणी केलीय. ३० सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही, बघतोच असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. सरकारनं ३० सप्टेंबरच्या आत कर्जमुक्तीच करायची . पिकविमे सगळे द्यायचे, अनुदान सुद्धा सगळं द्यायचं. शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आक्रमक भूमिका

सरकार मराठा समाजाच्या मागण्या स्वीकारत नाही, त्यामुळे सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवारांचे जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil News) यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना किती दिवस फसवायचं? कर्जमुक्ती करा अन् त्यानंतर कर्जही देवू नका, फक्त वीज आणि पाण्याची व्यवस्था करा असं जरांगे पाटील साम टीव्हीसोबत बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT