Manoj Jarange Patil: मोठी बातमी! भाषण करताना मनोज जरांगेंना चक्कर आली; प्रकृती खालावल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Manoj Jarange Patil Health deteriorated Admitted to Sahyadri Hospital : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलंय. त्यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. मनोज जरांगे पाटील यांना रात्रीच्या सभेनंतर उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. चक्कर आल्यामुळे जरांगे पाटील यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सकाळी ११ वाजेनंतर मनोज जरांगे पाटील अहील्यानगरकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळत (Manoj Jarange Patil) आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी पुण्यात शांतता रॅलीत भाषण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. सततचा प्रवास, उपोषण आणि सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil News) यांना अशक्तपणा आलाय. दरम्यान चक्कर आल्यामुळे त्यांना स्टेजवर बसावे लागले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

अशक्तपणा जाणवला...चक्कर आली

मागील चार ते पाच दिवसांपासून जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण रॅलीत सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती ठीक नसून हात थरथरत असल्याचं त्यांनी नमूद केले. भाषण संपल्यानंतर जरंगे पाटील यांना अचानक अशक्तपणा जाणवला आणि ते मंचावर ( Manoj Jarange Patil Health deteriorated) बसले. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची आरक्षणाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहे. शांतता रॅलीच्या माध्यमातून ते मराठी बांधवांना भेटी देत आहेत.

मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange: साताऱ्याच्या सभेत मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, भाषणावेळी हात थरथरले, स्टेजवरच खाली बसले, VIDEO

शांतता रॅलीचा उद्या नाशिकमध्ये समारोप

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा उद्या नाशिकमध्ये समारोप होणार आहे. समारोप रॅली आणि सभेसाठी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आलीय. शहरातील मध्यवर्ती सीबीएस चौकात जरांगे पाटील यांची सभा होणार (Maratha Reservation issue) आहे. जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीकठिकाणी भगवे झेंडे आणि जरांगे पाटील यांचे बॅनर्स लावून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा मुंबईत जावून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री; पुण्यातील शांतता रॅलीत झळकले बॅनर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com