मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे काँग्रेस पक्ष सोडणार
मनोहर शिंदे हे भाजपमध्ये जाणार
मनोहर शिंदे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
संभाजी थोरात, साम प्रतिनिधी
साताऱ्यातील राजकारणाता मोठी उलथापालथ होणार आहे. भाजपनं येथील काँग्रेस सुरुंग लावत खिंडार पाडलंय. अनेक दिवसांपासून मनोहर शिंदे दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा होती, आता या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपच्या नेत्यांच्या उपस्थिती शिंदे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे लवकरच हाती कमळ घेणार आहेत. जुने निष्ठावंत नेते पक्षातून जात असल्यानं काँग्रेस पक्ष राज्यात कमकवूत होत असल्याचं दिसत आहे. राज्यातील काँग्रेस पक्ष नाहीसा झालाय, असं विधान भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं होतं. आता जुने निष्ठावंत नेते भाजपकडे जात असल्यानं पक्षाला उतरती कळा लागली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मनोहर शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्यानं हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे यांचा मुंबई दौरा वाढला असून भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. मुंबईतील मंत्रालायत कऱ्हाड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत मनोहर शिंदे यांनी भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचा भाजपमधील प्रवेश निश्चीत मानला जातोय.
साताऱ्यातील दक्षिण कऱ्हाड हा अनेक वर्षांपासूनचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते, माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आत्तापर्यत कऱ्हाड दक्षिणचे मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय. मात्र भाजपचे आमदार डॉ.अतुल भोसले यांनी डाव खेळत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत खिंडार पाडलंय. ते कऱ्हाड दक्षिणचे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आमदार झाल्यापासून त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावलाय. त्याअंतर्गत त्यांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास प्रारंभ केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.