Yavatmal BJP Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: यवतमाळमध्ये भाजपला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Yavatmal Politics: यवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते विजय चोरडिया यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली. या सर्वांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे यवतमाळमध्ये शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढली.

Priya More

Summary -

  • यवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का

  • विजय चोरडिया यांनी भाजपची साथ सोडली

  • चोरडिया यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश

  • पक्षांतर्गत गटबाजी आणि अपमानामुळे त्यांनी भाजपला ठोकला रामराम

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. यवतमाळमधील भाजपच्या बड्या नेत्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. भाजपाचे नेते विजय चोरडिया यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हाती घेतलं. त्यामुळे यवतमाळमध्ये शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.

यवतमाळच्या वणी येथील भाजपाचे नेते विजय चोरडिया यांना यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गळाला लावले आहे. विजय चोरडिया हे मोठे व्यावसायिक आणि भाजप संघटनेत सक्रिय होते. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजप कमकुवत होत आहे आणि पक्षात मानसन्मान शिल्लक नाही, असे सांगत विजय चोरडिया यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

विजय चोरडिया यांच्या या पक्षप्रवेशामुळे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने वणी विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ गटबाजीने गमाविल्या नंतर चोरडिया यांनी पक्ष सोडणे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. तर विजय चोरडिया यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

Maharashtra Politics: नाशिकमध्ये 'आघाडीला' भगदाड, तब्बल २०० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT