Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: रायगडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, अनेक बड्या नेत्यांनी सोडली अजित पवारांची साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती

Raigad Politics: रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. अजित पवार गटातील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं.

Priya More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीपूर्वीच अनेक पक्षांमध्ये इनकमिंक तर काही पक्षांमध्ये आऊटगोईंग सुरू आहे. अशातच रायगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे खोपोलीमधील माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली. या सर्वांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. खोपोलीमध्ये राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलदीपक शेंडे यांच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील धनुष्यबाण हाती घेतलं.

खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षांसह अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रायगडमध्ये शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. हा अजित पवारांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT