Chhagan Bhujbal And Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त, छगन भुजबळांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal And Eknath Shinde: मंत्रिपदाच्या वाटापावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजय मिळवला. निकाल लागून ११ दिवस झाले तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. राज्यात सराकर स्थापनेवरून सध्या गोंधळ सुरू आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे.

मंत्रिपदाच्या वाटापावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे शपथविधीला उशिर होत आहे. या सर्व गोंधळादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. 'महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त आहे.', असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मोठं विधान केले आहे. 'शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट जास्त आहे. स्ट्राइकरेटनुसार आम्ही २ नंबरवर आहोत. महायुतीमध्ये भाजप एक नंबरवर आणि आम्ही दोन नंबरवर आहोत.', छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

छगन भुजबळांनी सांगितले की, 'अजित दादासोबत आमची बैठक झाली तेव्हा स्ट्राइक रेटबाबत विषय झाला. राज्यात एक नंबर भाजप आहे तर दोन नंबरला आम्ही आहे.' मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का? यावर उत्तर देताना भुजबळांनी सांगितले की, 'नवीन चेहऱ्यांना संधी नेहमी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहेत. दरवेळी १६० असतात. यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील.'

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपद वाटप आणि स्ट्राईक रेटवरून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. त्यांनी सांगितले की, 'राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केली आहे. आमची मागणी शिंदेसाहेब करत आहेत. आम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या वेळीची युती टिकवून ठेवण्यासाठी लढलो. आम्ही ६ महिने फोन बंद केले. आम्ही त्यामुळे १०० जागा लढलो असतो आणि जास्त जागा जिंकलो असतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : BA पास तरुण करायचा महिलांची प्रसूती, बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; असा अडकला जाळ्यात

Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ, सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

क्रिकेटच्या मैदानात राडा घालणारा श्रेयस अय्यर आहे जादूगार! 52 पत्त्यामधून नेमका काढला बदामचा एक्का, व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT