Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde Decision Saam TV
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: आमची लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही तर..., शिंदेंच्या निर्णयावर चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde Decision: एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी समर्थन केले आहे.

Priya More

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या निर्णयानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मजबूत आणि अभेद्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली ती राज्याच्या १४ कोटी जनतेसाठी एक मोठी भूमिका असून आम्ही त्याचे स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व जो निर्णय करेल तो सर्वांनाच मान्य असेल.', असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. 'आमची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणसाठी आहे.', असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत करत आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राला अधिक बळकटी मिळाली आहे. महायुतीच्या अभूतपूर्व विजयात तिन्ही नेते आणि सर्व घटक पक्षांची मेहनत असून त्यामुळे मोठा जनादेश मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी कणखर मुख्यमंत्री म्हणून मागील अडीच वर्षे काम केले असून समाजाच्या प्रत्येक घटकाला आणि महाराष्ट्राच्या विकासाला न्याय दिला.'

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनांना बंद करण्याचे काम महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पण बंद पडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदे यांचं काम बघतोय.'

तसंच, 'देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी एक मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून समृद्धी महामार्गासारखा मोठा महामार्ग पूर्ण केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला. हे शिंदे यांना पटले नाही आणि त्यासाठी हिंदुत्वाची भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुढे घेऊन महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी मोठी भूमिका घेतली होती.', असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT