Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : जालन्यात महायुतीत फूट? अर्जुन खोतकर यांचं नाव वगळल्याने शिवसैनिकांचा संताप

Maharashtra Political News : जालन्यात पीआर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटनादरम्यान महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले. या कार्यक्रमाच्या फलकावर आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव नसल्याने शिवसैनिकांचा संताप उसळला. या फलकाला आक्रमक शिवसैनिकांनी काळे फासले.

Alisha Khedekar

जालन्यात पीआर कार्ड फलकावर अर्जुन खोतकर यांचं नाव नसल्याने शिवसैनिक संतप्त

पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमात फलकाला काळे फासले

शिवसेनेचा भाजपवर जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा आरोप

निवडणुकीपूर्वी महायुतीतील वाद चव्हाट्यावर

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना जालन्यात श्रेय वादावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. पीआरकार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावर शिवसेना आमदार अर्जून खोतकर यांच नाव नसल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नामफलकाला शिवसैनिकांनी काळे फासले. दरम्यान जाणूनबुजून नाव वगळण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे शनिवारी जालना जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यांनी काल सायंकाळच्या सुमारास चंदनझीरा परिसरामध्ये झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकाचे उद्घाटन केलं होतं. मात्र या फलकावर शिवसैनिकांनी अर्जुन खोतकर यांचे नाव नसल्याने हा फलक उखडून टाकत या फलकाला काळ फासल आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीत धुसफूस पाहायला मिळत आहे.

झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड मिळाव म्हणून आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रयत्न केले असून भाजप नेत्यांनी घाईगडबडीत छोटेखानी कार्यक्रम घेऊन जाणीवपूर्वक खोतकरांच नाव वगळण्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावर आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव नसल्याने हा संपूर्ण प्रकार घडला असून यामुळे जालन्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

या कर्यक्रमाच्या उद्घाटन नामफलकावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रमुख उपस्थिती आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, आमदार संतोष दानवे, माजी नगरसेवक अशोकराव पवार, माजी नगरसेवक सतीश जाधव इत्यादींची नावे होती, परंतु विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचे नाव वगळण्यात आले.

याप्रकरणी माध्यमांशी बोलताना शिवसैनिक अंबादास चित्तेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, "झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड मिळावे म्हणून आमदार अर्जुनराव खोतकर मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे पाहून भाजपच्या सत्तापिपासू नेत्यांनी घाईगडबडीत हा छोटाखानी कार्यक्रम घेतला आणि जाणीवपूर्वक नामफलकावरून विद्यमान आमदारांचे नाव वगळले. यामुळे संतप्त होऊन शिवसैनिकांनी हा प्रकार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

Maharashtra Live News Update : दिवाळीच्या गर्दीत हरवला चिमुकला, पोलिसांनी अवघ्या 15 मिनिटांत शोधला

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

Cyclone Alert : चक्रीवादळाचं देशात थैमान, मच्छिमारांना मोठा फटका, IMD चा काय आहे इशारा ?

Kartiki Ekadashi : विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; कार्तिकी एकादशीची तयारी, विठ्ठलाचे राजोपचार झाले बंद

SCROLL FOR NEXT