Sharad Pawar And Yugendra Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना ८५ जागा मिळणार, दोन दिवसांत यादी निश्चित होणार, बारामतीमधून युगेंद्र पवार मैदानात?

Sharad Pawar And Yugendra Pawar: बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीतून युगेंद्र पवार शरद पवार गटाचे उमेदवार असणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

आगामी विधानसभा निवडणुकीची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा होणार आहे. कधी निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये महाविकास आघाडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाला राज्यात ८५ ते ९० जागा मिळणार आहेत. ८५ उमेदवारांची यादी दोन दिवसांत निश्चित होणार आहे. या ८५ उमेदवारांची जोरदार तयारी झाली आहे. उद्या किंवा परवा जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. ८५ जागा ताकदीने निवडून आणण्याचा पक्षाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

महत्वाचे म्हणजे, बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीतून युगेंद्र पवार शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. युगेंद्र पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. पहिल्या यादीत बारामतीचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. बारामतीमधून महायुतीकडून अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. आता महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की, 'आचारसंहिता जाहीर होत आहे निवडणुका देखील जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. याआधीच निवडणूक होईल असे वाटत होतं पण तसं झालं नाही. आमच्या पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे. अनेक इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. आमच्या पक्षात एकूण १६०० लोकांनी मुलाखती दिल्या. लोकसभेत राज्यातील लोकांनी महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला. आमची महाविकास आघाडी म्हणून तयारी पूर्ण झाली आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. २ ते ३ दिवसांत जागावाटपाचा निर्णय जाहीर होईल. २१८ जागांवर एक वाक्यता झाली आहे. २ ते ३ दिवसांत सगळं होईल.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जागा वाटपाबद्दल सांगितले की, 'जागावाटप जाहीर होईल. २१० पेक्षा जास्त जागांवर आमचं एकमत झालं आहे. राहिलेल्या जागांवर उद्याच्या दिवसात निर्णय घेऊन मोकळे होऊ. मुख्यमंत्री पदासाठी लढू नका महविकास आघाडीसाठी लढा अशा सूचना काँग्रेस नेत्यांनी केल्याच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा महाराष्ट्राला मान्य असेल असा चेहरा असेल तर त्यांनी तो जाहीर केला तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमच्यकडे एकच चेहरा आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात, लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ₹२००० खटाखट जमा होणार; तुम्हाला मिळणार की नाही? वाचा सविस्तर

Rent Agreement : नवा कायदा, डिपॉझिट जास्त घेततल्यावर घर मालकावर कारवाई होणार, वाचा नेमकं सत्य काय?

Health Care : उचकी थांबत नाहीये? मग करा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT