Sharad Pawar and Dhananjay Munde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Dhananjay Munde Criticized Sharad Pawar: शरद पवारांकडून धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागत शरसंधान साधले असून थेट इशारा देखील दिला आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना इशारा दिला आहे. 'शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?', असा सवाल करत त्यांनी शरद पवार यांना थेट इशारा दिला. धनंजय मुंडेंनी बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना शरद पवारांवर टीका केली. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

शरद पवारांकडून धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागत शरसंधान साधले असून थेट इशारा देखील दिला आहे. 'जर मी एवढ्या लहान कुटुंबात, लहान जातीतला आणि एवढ्या लहान जातीत जन्माला आलो असेल, तर का कुणाला एवढी भीती वाटायला पाहिजे? शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?', असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

'लोकसभेत पंकजाताईंचा गेम केला तसा धनंजयचा गेम करण्याची व्यूहरचना का? परळीत दहशत आहे, असं म्हणून कोणी या मातीचा अपमान करीत असेल तर धनंजय मुंडे कदापी सहन करणार नाही. त्यामुळे तुम्हीच सांगा परळीत माझी दहशत आहे का? सगळ्यांना वाकून बोलून, नमस्कार घालून मेलोय लेकांनो अन् म्हणतात माझी दादागिरी. जर व्यापाऱ्यांच्या व्यवसायात कोणी आडवा आला तर त्याची गाठ माझ्याशी असेल.'असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागत थेट इशारा देखील दिला आहे.

तर, 'वैद्यनाथ कारखान्यासह मुंगी कारखाना आणि सूतगिरणी देखील चालू होणार आहे.', असं देखील त्यांनी म्हटले आहे. ते बीडच्या परळी येथे स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना थेट इशारा दिल्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांना आता शरद पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT